Mhada Lottery : आवडीनुसार मिळणार म्हाडाचं घर! सुरु केली 'बुक माय होम' भन्नाट ऑफर

'असा' करा अर्ज


मुंबई : हक्काचं घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र महागाईमुळे वाढत चाललेल्या घराच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेणं शक्य होत नाही. यामुळे अनेकजण सिडको किंवा म्हाडाकडून निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery) वाट पाहत असतात. अशाच लोकांसाठी म्हाडाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाने घरविक्रीसाठी नवी योजना आखली आहे. त्यानुसार आता ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार घर खरेदी करता येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या घरांसाठी ही योजना लागू असणार आहे.



म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या विरार- बोळिंज, खोणी, शिरढोण, गोठेघर, भंडार्ली या ठिकाणी बांधलेली घरे विक्रीअभावी रिकामीच पडली होती. ही घरे विकण्यासाठी वेळोवेळी सोडती आयोजित करण्यात आल्या, मात्र खरेदीदारांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. हे पाहता म्हाडाने आता ‘बुक माय होम’ (Mhada Book My Home) ही नाविन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांना हवे असलेले घर निवडण्याचा आणि थेट बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.


या व्यासपीठावर इच्छुकांना सर्व रिक्त घरे नकाशासह दाखवण्यात येणार आहेत. घराची किंमत, परिसरातील सुविधा, आणि इतर तपशील दिले जातील. ग्राहकांना घर निवडून थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि ‘प्रथम नोंद, प्रथम विक्री’ या तत्वावर राबवण्यात येणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या या योजनेमुळे कोकण मंडळातील विरार - बोळिजमधील धुळखात पडलेल्या घरांसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद येईल, अशी आशा म्हाडाला आहे.



कसा कराल अर्ज?



  • घराच्या नोंदणीपासून ते घराच्या निवडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइनच आहे. त्यात कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप नाही.

  • नोंदणीच्या वेळी उमेदवारांना त्यांचे आधार कार्ड , पॅन कार्ड आणि स्व-घोषणापत्राच्या स्कॅन केलेल्या प्रती वेबसाईटवर अपलोड कराव्या लागतात.

  • अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची डिजिटल प्रणालीद्वारे स्वयंचलितपणे पडताळणी केली जाईल.

  • पडताळणीनंतर अर्जदाराचे प्रोफाइल तयार होईल.

  • अर्जदाराचे प्रोफाइल तयार झाल्यानंतर अर्जदारांना फ्लॅटची यादी पाहायला मिळेल.

  • त्यानंतर अर्जदार त्यांना अपेक्षित असलेले फ्लॅट रिअल टाइममध्ये निवडून बुक करू शकतात. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या आधारावर केले जाते.

  • तसेच, उपलब्ध घरांची माहिती फ्लॅट नंबरसह सर्व माहिती अर्जदाराला मिळेल.

  • त्यानंतर अर्जदारास त्यांना आवडेल ते घर आणि आपल्या पसंतीनुसार निवडू शकतात.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद