पहलगाममध्ये आठवडाभर राहिल्यानंतर अतिरेक्यांनी केला हल्ला

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवार २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटक आणि एक स्थानिक अशा एकूण २६ जणांची हत्या केली. अतिरेक्यांनी नागरिकांवर गोळीबार केला. या प्रकरणात एनआयए तपास करत आहे. आतापर्यतच्या तपासातून धक्कादायक माहिती हाती आल्याचे सूत्रांकडून समजते.



हल्ला मंगळवार २२ एप्रिल रोजी झाला असला तरी अतिरेकी पहलगाममध्ये १५ एप्रिल पासून मुक्कामाला होते. स्थानिक पातळीवर निवडक नागरिकांनी अतिरेक्यांना मदत केली. या मदतीमुळेच अतिरेकी सुरक्षितरित्या लपून राहू शकले. प्रत्यक्ष हल्ल्याच्या दिवशी शस्त्र हाती घेऊन अतिरेकी नागरिकांची हत्या करू शकले होते; असे तपासातून एनआयला कळले असल्याचे सूत्रांकडून समजते.



घनदाट जंगल, डोंगराळ परिसर, गुहा या नैसर्गिक रचनेचाही अतिरेक्यांनी त्यांच्या कारवाईसाठी वापर करुन घेण्याचे नियोजन केले होते. हा हल्ला लष्कर - ए - तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फोर्सच्या अतिरेक्यांनी केला. पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेला एक अतिरेकी हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी कमांडो होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यानंतर अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात हाशिम मुसा नावाच्या अतिरेक्याचे चित्र आहे. तोच हा अतिरेकी आहे. हाशिम मुसा हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) कमांडो होता.


मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो होता. लष्करी सेवेतून बाहेर पडल्यानंतर मुसा लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करू लागला. कलम ३७० हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक प्रगती सुरू आहे. या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला ब्रेक लावण्यासाठी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांनाच लक्ष्य केले.


पर्यटकांना ठार करण्याआधी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळेच अतिरेक्यांनी सहजतेने गोळीबार करुन पर्यटकांना लक्ष्य केले. अतिरेकी हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच आर्थिक मदत दिली होती. या व्यतिरिक्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या १५ जणांनी अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर हवी ती मदत पुरवल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आता एनआय करत आहे.


एनआयएच्या हाती पाकिस्तानी अतिरेक्यांचे कोडवर्ड बुक आले आहे. अतिरेक्यांनी पहलगाममध्ये येण्यापासून ते हल्ला करुन घटनास्थळावरुन पळून जाईपर्यंत वापरलेले कोडवर्ड आणि त्यांचे अर्थ समजून घेणे या पुस्तकामुळे एनआयएला सोपे झाले आहे. सध्या तपास पथक कोडवर्डच्या मदतीने अतिरेकी त्यांच्या म्होरक्यांना कोणकोणती माहिती देत होते हे जाणून घेत आहे.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ