Health: अशा लोकांनी चुकूनही आईस्क्रीम खाऊ नये

मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले जाते. कडाक्याच्या उन्हामध्ये गारेगार थंडावा देणारे आईस्क्रीम प्रत्येकाला आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही लोकांसाठी आईस्क्रीमचे सेवन खूप धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या कोण आहेत ते ज्यांनी चुकूनही आईस्क्रीमचे सेवन करू नये.



डायबिटीज रुग्णांनी आईस्क्रीम खाऊ नये


आईस्क्रीम बनवण्यासाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशातच जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर हे खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. याच्या सेवनामुळे शुगर लेव्हल अचानक वाढू शकते.



हृदयाच्या रुग्णांसाठी आईस्क्रीमचे सेवन नुकसानदायक


आईस्क्रीम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकल्स हृदयासाठी हानिकारक आहेत. अशातच जर तुम्ही हृदयरोगी असाल तर याचे सेवन अजिबात करू नये.



दातांसाठी आईस्क्रीमचे नुकसान


आईस्क्रीमच्या अधिक सेवनाने दातांमध्ये कॅव्हिटी होण्याची समस्या अधिक वाढते. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या अधिक वाढू शकतात. अशातच दररोज आईस्क्रीम खात असाल तर ते कमी करा. तसेच आईस्क्रीम खाल्ले तर ब्रश करायला विसरू नका.


Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे