नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, २६ जखमी

वणी: रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच सप्तशृंगी मातेच्या वणीच्या गडावर नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला. वळण रस्त्यावर चालकाला अंदाज न आल्याने वाहन रस्त्याच्या खाली उतरून उलटले.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात गाडीत बसलेले २६ भाविक जखमी झाले असून जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. जखमींना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर हा अपघात झाला आहे.


आज सकाळी छोटा हत्ती या मालवाहू गाडीतून परिवार व नातलग नवस फेडण्यासाठी नांदुरी गडावर जाण्यासाठी निघाले होते. वळण रस्त्यावर चालकाचा अंदाज चुकला नांदुरी गड काही अंतरावर असताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला. वणी-नांदुरी रस्त्यावर दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर वळण रस्ता असून येथे वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. यामुळे वाहन सरळ जाऊन रस्त्याच्या खाली उतरून भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर उलटल्याने टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी आहेत. यात काही जणांना अधिक मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.


अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहन धारकांनी लागलीच मदत करत जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये