वेळ आणि टार्गेट तुम्ही ठरवा! – पंतप्रधान मोदींनी सैन्याला दिला फ्री हँड

  54

नवी दिल्ली: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली जात आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांच्या अध्यक्षांसह उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही सहभागी होते.



पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिली सूट


सूत्रांच्या माहितीनुसार ही बैठक सुमारे अडीच तास सुरू होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान मोदींनी लष्कराला पूर्णपणे सूट दिली आहे. ते म्हणाले, दहशतवादाला उत्तर देणे आमचा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. त्यांनी यावेळेस भारतीय सैन्य दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, आमची प्रत्युत्तर कारवाईची पद्धत काय आहे, टार्गेट्स काय असतील आणि याची योग्य वेळ काय असेल या प्रकारचे ऑपरेशन निर्णय घेण्यासाठी सैन्य दलाला संपूर्ण सूट देण्यात आली आहे.


पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपला नाहक जीव गमवावा लागला होता. यावेळेस पंतप्रधानांनी या हल्ल्याचा कट रचणारे तसेच दहशतवाद्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या