"तुमच्या नेत्यांना आवरा!" काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

  53

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा 


नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात त्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून, भाजपने विरोधकांवर निशाणा साधला आहे. (BJP targets Congress over controversial statement on Pahalgam attack)

पहलगाम हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. मात्र या दरम्यान, काँग्रेसच्या काही वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना "तुमच्या नेत्यांना आवरा' असा हल्लाबोल केला आहे. सोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'राहुल गांधीचे त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण नाही का?"


माध्यमाशी संवाद साधताना रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसची राष्ट्रीय एकतेची हाक दिली, ती फक्त औपचारिकता होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला. खरं तर, त्यांनी ही टिप्पणी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते, या टिप्पणीनंतर केली आहे. याबद्दल, रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस वरिष्ठांना विचारले की, "राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पक्षावर नियंत्रण नाही का? किंवा दोघांनीही औपचारिक भाषणे केली आणि इतरांना त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याची परवानगी दिली?"

वडेट्टीवार, तिम्मापूर आणि राहुल गांधीचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांचीही नावे


पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्याबद्दल सिद्धरामय्या यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार, कर्नाटकचे मंत्री आरबी तिम्मापूर आणि राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांचीही नावे घेण्यात आली. आणि तिम्मापूर सारख्या लोकांनी काही पीडितांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

'संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे'


भाजप नेत्याने म्हटले की, दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतासोबत आहे, मग ते अमेरिका असो, फ्रान्स असो किंवा सौदी अरेबिया असो, तरी हे नेते अशाप्रकारे बेजबाबदार भाष्य करत आहेत. ते म्हणाले की ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे.
Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या