मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बीएमसीकडून विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका व खासगी रूग्णालये, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग, मैदाने, शाळा आदींच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आल्या. यातून स्वच्छतेचा यशस्वीरित्या जागर केल्यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील स्वयंसेवी संस्था, नागरिक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आदींच्या सामूहिक प्रयत्नांतून २८ एप्रिल ते ९ मेदरम्यान दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान संपूर्ण मुंबईत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘स्वच्छ आणि सुंदर मुंबई‘ हे ब्रीद घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेसाठी निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत.

या अंतर्गत यापूर्वी संपूर्ण मुंबईत ‘सखोल स्वच्छता मोहीम’ राबविण्यात आली. तसेच, १७ मार्च ते २२ मार्च या कालावधीत रोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांची व्यापक स्वच्छता करण्यात आली. १ ते ४ एप्रिल या कालावधीत मुंबईतील प्रमुख क्रीडांगणांमध्ये आणि त्यानंतर, ७ एप्रिलपासून मुंबईतील शाळांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने संपूर्ण मुंबई महानगरात नियमितपणे स्वच्छता केली जाते. तथापि, अत्यंत सखोल आणि व्यापक पद्धतीने स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. २८ एप्रिल ते ९ मे या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान मुंबईतील सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संबंधित धार्मिक स्थळाशी निगडित विश्वस्त आणि अन्य प्राधिकृतांशी समन्वय साधून त्याठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले जाईल. प्रामुख्याने धार्मिक स्थळाभोवतालचा परिसर, वाहनतळ, घनकचरा संकलनाचे ठिकाण, पदपथ आदींची यांत्रिक तसेच स्वच्छता कर्मचारी यांच्या सहाय्याने व्यापक स्वच्छता करण्यात येईल. अडथळा निर्माण करणाऱया वस्तूंचे निष्कासन, कचऱयाचे संकलन आणि पाण्याने संपूर्ण परिसर धुवून काढणे आदी प्रक्रियांचा देखील यामध्ये समावेश असेल.

स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत विभागीय कार्यालयांनी (वॉर्ड) सक्रियपणे सहभाग नोंदवण्याच्या सूचनाही उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; लवकरच अटक होण्याची शक्यता

गिरिजा राऊत यांच्या तक्रारीमुळे अडचणी वाढल्या, विनायक राऊत यांना होणार लवकरच अटक  मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी गूड न्यूज! घाटकोपर-वर्सोवा मेट्रोचा प्रवास होणार गर्दीमुक्त; ४ ऐवजी धावणार ६ डब्यांची मेट्रो

मुंबई : मुंबईची पहिली वहिली आणि पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी सर्वात महत्त्वाची 'घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा' (Ghatkopar

Mumbai Murder Case : भयंकर! भररस्त्यात पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पतीला अटक

मुंबई : अंधेरी (Andheri) पश्चिमेतील ओशिवरा परिसरात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या

Mumbai Coastal Road Car Fire : मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात भीषण अग्नितांडव! धावत्या कारने घेतला पेट, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यात धक्कादायक घटना घडली आहे. बोगद्यातून

Mumbai Metro Line 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रोला मिळणार वेग! कशेळी डेपोचे काम युद्धपातळीवर; २७ हेक्टर प्रकल्पातील २३% काम पूर्ण

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो नेटवर्क आणखी मजबूत करण्यासाठी मेट्रो मार्ग ५

N.L. Dalmia School Fire : मीरा रोडमध्ये मोठी दुर्घटना टळली! एन.एल. डालमिया शाळेच्या इमारतीला भीषण आग; विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले

मीरा रोड : मीरा रोड येथील हरे कृष्ण मंदिराजवळ असलेल्या एन.एल. डालमिया शाळेच्या (N.L. Dalmia School Fire) इमारतीच्या वरच्या