मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्रभादेवी येथील क्राऊन मिल कंपाउंडमधील आलिशान निवासी संकुल असलेल्या ‘रुस्तमजी क्राउन’ इमारतीत झालेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात तीन सदनिकांमधील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले असून टप्प्या टप्प्याने इतर अनधिकृत बांधकामे तोडण्यात येणार आहेत. महापालिकेने एकूण १३८ सदनिका धारकांना नोटीस पाठवली आहे. या सदनिका राजकारणी, सनदी अधिकारी आणि नामवंत व्यावसायिकांशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या कारवाईने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध 'भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'वर ओढवलेल्या दुर्दैवी संकटाच्या काळात 'लालबागच्या राजा सार्वजनिक ...
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये याबाबतची तक्रार दाखल केली होती. रुस्तमजी क्राउनमधील १२८ सदनिकांच्या मालकांनी लिफ्टच्या आजूबाजूच्या सामाईक जागेवर अतिक्रमण करून ती जागा आपल्या सदनिकांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. या तक्रारीनंतर महापालिका जी-दक्षिण विभागातील इमारत व कारखाना विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी मार्च २०२६ मध्ये संबंधित सर्व सदनिकांना मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ३५४-अ तसेच एमआरटीपी कायद्यातील कलम ५३(१) अंतर्गत कथित अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा बजावल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे जी-दक्षिण विभागाने येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. संबंधित सामाईक जागेची बाजारातील किंमत २५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. या भागातील मालमत्तेचे दर प्रति चौरस फूट १ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत तीन तळघर, तळमजला आणि ६३ मजले आहेत. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ या निवासी विंग्स १४व्या ते ६३व्या मजल्यांदरम्यान आहेत. ‘ए’ आणि ‘बी’ विंगमध्ये प्रत्येकी १८६ सदनिका असून, त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले आहे. अनधिकृत बांधकाम तसेच एफएसआय उल्लंघनाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने ‘ए’ आणि ‘बी’ विंगमधील सदनिकांना मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ आणि एमआरटीपी कायदा, १९६६ अंतर्गत एकूण १३८ नोटिसा बजावल्या.
मुंबई : विले पार्ले पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित हिट-अँड-रन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची ₹५,००० जामीन ...
महापालिका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार “कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आणि संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर लागू असलेल्या प्रकरणांमध्ये महापालिकेने ‘स्पीकिंग ऑर्डर’ जारी केले. त्यानंतर सोमवारी तीन सदनिकांमध्ये तोडक कारवाई करण्यात आली. या सदनिकांमध्ये सामाईक लॉबी बंद करून ती सदनिकेच्या क्षेत्रफळात समाविष्ट करणे, तसेच किचन डक्ट आणि व्हेंटिलेशन शाफ्टची जागा सदनिकेत समाविष्ट करणे अशा अनधिकृत फेरबदलांचा समावेश होता. संबंधित ‘स्पीकिंग ऑर्डर’नुसार आणि निर्धारित कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून हे फेरबदल हटविण्यात आले.” दरम्यान, महापालिका जी-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.