Nitesh Rane : 'राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासासाठी सहकार्य करा'

मुंबई : तळसुंदे येथील राजापूर बंदर आणि प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाच्या विकासाला गती देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. राजापूर बंदर व प्रस्तावित जहाज बांधणी प्रकल्पाबाबत ‘ अँड शुअर पोर्ट प्रा. लि.’ या कंपनीच्या वतीने आज मंत्रालयात मंत्री राणे यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले. या प्रकल्पासाठी कंपनीने राजापूर येथे सुमारे १०० एकर जागा अधिग्रहित केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील विकासासाठी गुंतवणूकदार तसेच सक्षम भागीदार सहकार्य करण्यास इच्छुक आहेत. या माध्यमातून प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून संबंधितांना सहकार्य करण्याच्या सूचना मंत्री  राणे यांनी दिल्या.



राजापूर परिसरातील उपलब्ध क्षमता आणि बंदराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती तसेच बंदराशी संबंधित विविध उपक्रम विकसित झाल्यास परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. कोकणातील बंदर विकासाला गती देतानाच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राजापूर बंदर व जहाज बांधणी प्रकल्प महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Bhuleshwarcha Raja : 'लालबागच्या राजा'चे 'भुलेश्वरच्या राजा'वर वडीलकीचे छत्र; दुर्घटनाग्रस्त मंडळाला तब्बल २१ लाखांची आर्थिक मदत जाहीर

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध 'भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'वर ओढवलेल्या दुर्दैवी

Nitesh Rane : 'सौरऊर्जेवर आधारित आधुनिक प्रवासी बोटींच्या वापराला चालना द्या'

मुंबई : महाराष्ट्रातील जलवाहतूक व्यवस्था अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आधुनिक

Nitesh Rane : 'मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा'

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून

Western Ghats ESZ : 'पश्चिम घाट ESZ बाबत जनजागृतीसाठी वन विभागाने व्यापक मोहीम राबवावी'

मुंबई : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने २७ जुलै २०२६ रोजी पश्चिम घाट पर्यावरण

Maha e-HRMS : देशातील पहिले स्वयंचलित ई ऑर्डर मॉड्यूल 'महा ई-एचआरएमएस' प्रणाली राज्यात कार्यान्वित

मुंबई : देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये

Revised process of Aadhaar authentication : वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया

मुंबई : वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन