Pahalgam Attack Impact: पहलगाम हल्ल्याचा असाही फटका! माता वैष्णवदेवीच्या भाविकांची संख्या घटली

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे.


जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे, जम्मू काश्मीरच्या पर्यटन व्यवसायावर त्याचा मोठा फटका बसला आहे. या हल्ल्यामुळे पर्यटक भयभीत झाले असून, आपले आगाऊ तिकीट रद्द करत आहे. दरम्यान माता वैष्णवदेवीच्या भाविकांची (Vaishno Devi Devotees) संख्याही घटली आहे.

हॉटेल व्यवसायिकांना फटका


पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर वैष्णवदेवीला जाणाऱ्या भाविकांनी आगाऊ बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे हॉटेल्स आणि इतर सेवांच्या बुकिंगमध्ये घट झाली आहे.

वैष्णवदेवीमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं आवाहन हॉटेल चालकांकडून करण्यात येतंय, तसेच तीर्थक्षेत्र सुरक्षित घोषित करण्यासाठी श्राइन बोर्ड सक्रिय आहे. मात्र तरीही पर्यटक बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे कटरा येथील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हे असेच चालू राहिले तर, हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे घोडेस्वार, पोर्टर आणि सर्व प्रकारच्या व्यवसायांना देखील येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक

दिवाळीपूर्वी दिल्लीत 'कृत्रिम पाऊस' पाडण्याची योजना

दिल्लीच्या प्रदूषणावर मात करण्यासाठी 'कृत्रिम पावसाचा' आधार! नवी दिल्ली: दिवाळीच्या अवघ्या एका आठवड्यापूर्वी

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी लक्झरी कोचची झलक सादर

नवी दिल्ली : इंडो-रशियन संयुक्त उपक्रम काइनेट रेल्वे सोल्युशन्सने बुधवारी राजधानीतील भारत मंडपम येथे आयोजित

बघा, तुम्ही वापरता 'ती' टूथपेस्ट नकली; फॅक्टरीचा पर्दाफाश!

बनावट ENO, Maggi, सिगारेट, कॉस्मेटिक्स नंतर आता कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टमध्ये भेसळ; ९.४३ लाखांचा साठा जप्त नवी