INS सूरतवरुन यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय आणि लष्करी घडामोडींकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर आयएनएस सूरत या विनाशिकेवरुन भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किमी. पर्यंतच्या लक्ष्याला अचूक हल्ला करुन नष्ट करण्यास सक्षम आहे.





भारताने ज्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ते स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र (indigenous guided missile) आहे. भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलासाठी हे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.



अरबी समुद्रात आयएनएस विक्रांत

भारत - पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेची नियुक्ती अरबी समुद्रात करण्यात आली आहे. कोणतीही विमानवाहक नौका समुद्रात तैनात असते त्यावेळी त्या नौकेच्या भोवताली युद्धनौका, विनाशिका, पाणबुड्या यांचा ताफा असतो. या व्यवस्थेनुसार आयएनएस विक्रांत इतर लढाऊ नौकांचा ताफा अरबी समुद्रात नियुक्त करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या विमानवाहक नौकेवर मिग २९ के लढाऊ विमानांचा ताफा आणि कामोव्ह ३१ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे. ही नौका २६२ मीटर लांब आणि ५९ मीटर रुंद आहे. आयएनएस विक्रांत एकावेळी किमान ४० लढाऊ विमानांचा ताफा स्वतःसोबत घेऊन फिरण्यास सक्षम आहे. शिवाय या नौकेवर किमान ६४ बराक क्षेपणास्त्र कोणत्याही वेळी तयार स्थितीत ठेवली जातात. ही नौका जगातील सर्वोत्तम दहा विमानवाहक नौकांपैकी एक आहे.
Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा