Pahalgam Terror Attack: प्रविण तरडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, पहलगाम हल्ल्यात गमावला जीवलग मित्र

पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी आपला जवळचा मित्र गमावला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी शेअर केली.


भारताचे स्वित्झरलँड म्हणून ओळखले जाणारे जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे मंगळवार, दिनांक 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात 28 निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या धक्कादायक घटनेच्या विरोधात देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू आणि राजकीय व्यक्तिमत्वांनी या घटनेविरुद्ध निषेध आणि शोक व्यक्त केला. ज्यात मराठी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे यांनी देखील या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र या पोस्टद्वारे त्यांनी लोकांना आणखीन एक धक्का दिला आहे. तो म्हणजे, या हल्ल्यात त्यांनी त्यांचा जिवलग मित्र गमावल्याचे सांगितले आहे.



आतंकवाद आज घरात आला...



प्रविण तरडेने पोस्ट शेअर करत पहलगाम हल्ल्यात जवळचा मित्र गमावल्याची माहिती दिली. त्याने पोस्ट शेअर करत लिहिलं, 'आतंकवाद आज घरात आला..माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला. आम्ही काही करु शकत नाही.' ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोकं कमेंटमध्ये दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहत आहेत.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग