Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा जीव गेला आहे. आणि २० जण जखमी झाले आहे. यातच आता सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.


सोनू सूद
अभिनेता सोनू सूद पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाला की, "काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला जागा नसावी आणि हे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर आरोग्य मिळो ही प्रार्थना.


अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमार ट्विट करत म्हणाला, ‘पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मन हेलावून गेले. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे निव्वळ क्रूरता आहे. मी पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करतो.




शरद पोंक्षे
अभिनेते शरद पोंक्षे फेसबूकवर पोस्ट करत म्हणाले ‘आता घरात घुसून मारा. एकालाही सोडू नका अमित शहा व मोदीजी…’ एवढंच नाही तर, अभिनेता संजय दत्त, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


सांगायचं झालं तर, पहलगाम हत्याकांडात अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सीआरपीएफची क्विक अ‍ॅक्शन टास्क फोर्स देखील दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Comments
Add Comment

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने

चिंतामणीचे सेवेकरी पांडुरंग मोरेंवर आला म्युझिक व्हिडीओ

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव देशभरातल्या भाविकांसाठी चर्चेचा विषय असतो. हा गणेशोत्सव उत्साहात साजरा

Shahid Kapoorला हा नाश्ता इतका आवडतो की सातही दिवस तो खाऊ शकतो, मीरा राजपूतने केला खुलासा

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत दोघेही त्यांच्या फिटनेसबद्दल आणि डाएटबद्दल खूप