चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा 'येलो अलर्ट'

  64

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४ एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे. जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.



चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस सर्वाधिक उष्णतामानाची नोंद


सोमवारी चंद्रपुरात ४५.६ अंश सेल्सियस सर्वाधिक उष्णतामानाची नोंद झाली.हे देशातीलच नव्हे ,तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले.


गेल्या काही दिवसांपासून उन्हाने चंद्रपूरकरांना अक्षरश हैराण केले आहे. ऊनापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, टोपी आवर्जून घातली जात आहे. काही दिवसात पारा चांगलाच वाढला असून सोमवारी ब्रम्हपुरीचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहचला.दरम्यान जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या