Share Market News : या आयटी स्टॉकवर ९ ब्रोकरेज फर्म्सनी का अहवाल दिला? जर तुम्हीही पैसे गुंतवले असतील तर ही बातमी लगेच वाचा..

Share

मुंबई : भारतातील आघाडीची आयटी कंपनी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील सक्रिय कंपनी Infosys बाबत एकाच वेळी ९ प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी आपल्या रिसर्च रिपोर्ट्स सादर केल्या आहेत. (Share Market News) जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हे अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Infosys चा टारगेट प्राइस कमी का केला गेला?

सध्या Infosys चा शेअर १४२० च्या दरावर ट्रेड होत आहे. कंपनीने नुकतीच FY26 साठी 0–3 टक्के YoY रेव्हेन्यू ग्रोथची गाईडन्स (constant currency मध्ये, अधिग्रहण वगळून) जाहीर केली आहे, जी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे. यामुळेच अनेक ब्रोकरेज फर्म्सनी Infosys चा टारगेट प्राइस खाली आणला आहे, जरी रेटिंग बर्‍याचशा फर्म्सनी कायम ठेवली आहे.

वेगवेगळ्या ब्रोकरेज फर्म्सचे अपडेट्स

CLSA : Accumulate रेटिंग कायम, टारगेट १८८१ वरून १८६१

JP Morgan : Overweight रेटिंग कायम, टारगेट १९०० वरून १८००

Morgan Stanley : Equalweight रेटिंग कायम, टारगेट १७४० वरून १५३०

Jefferies : Buy रेटिंग कायम, टारगेट १७०० वरून १६६०

Bernstein : Outperform रेटिंग, टारगेट १७८० वरून १६८०

कमकुवत मागणी आणि गाइडन्स यामुळे चिंता व्यक्त

Citi : Neutral रेटिंग कायम, टारगेट १६३५ वरून १५२५

Macquarie : Neutral रेटिंग कायम, टारगेट १७५०

HSBC : Buy रेटिंग, टारगेट १९३५ वरून १७००

Nomura : Buy रेटिंग, टारगेट १७२०

दरम्यान, Infosys ने AI आणि IT क्षेत्रात आपली पकड कायम ठेवली असली, तरी अलिकडच्या रेव्हेन्यू गाइडन्समुळे बाजारात थोडीशी चिंता पसरली आहे. ही घसरण तात्पुरती असू शकते, पण गुंतवणूक करताना कंपन्यांच्या कमाईच्या अपेक्षा, नवीन प्रकल्पांचा परिणाम आणि मार्केट सेंटिमेंट लक्षात घेणे आवश्यक आहे.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

1 hour ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

2 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

3 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

3 hours ago