मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे चेन्नईला फायदा झाला. आजचा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे जे फलंदाजीला उपयुक्त आहे.
चेन्नई व मुंबई हे दोन्ही संघ ह्या हंगामात मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. दोन्ही संघ अगोदरचा सामना जिंकल्यामुळे दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे व आता सर्वच संघात जिंकण्याची चढाओढ सुरु झाली आहे. मुंबईचा सलामीचा प्रश्न अजून सुटलेला नाही, अजूनही हिटमॅन रोहित शर्मा संघाला एक आश्वासक सुरवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.
मधल्या फळीत विल जैक्सच्या रूपाने अजून एक फलंदाज मुंबईच्या संघात सामील झाला आहे त्यामुळे मुंबईसाठी ती एक जमेची बाजू आहे. गोलंदाजीमध्ये बुमराहचे आगमन मुंबईसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण शेवटच्या षटकात बोल्ट व पंड्या तेवढा प्रभावी ठरत नाही. चेन्नईच्या बाबतीत फलंदाजीमध्ये अजूनही हा संघ चाचपडताना दिसतो आहे. धोनीचे नेतृत्व फलंदाजीमध्ये कमी पडते आहे, तसेच शेवटच्या षटकात हाणामारी करण्यासाठी त्यांच्याकडे हीटरची कमतरता आहे. चला तर बघूया हार्दिक पंड्याचा संघ मागील पराभवाचा वचपा काढणार का?
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…