Mumbai Local : कसारा-कल्याण मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

  70

एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या


मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा ते कल्याण मार्गादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सदर भागातील लोकल स्थानकांवर सकाळपासून प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत असून ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, कसारा ते कल्याण यादरम्यानच्या रेल्वे रुळाच्या जवळच पोकलेन वापरून एक काम केले जात होते. मात्र या पोकलेनचा धक्का सिग्नल यंत्रणेच्या वायरला लागला आणि सिग्नल यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या ६ लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.


दरम्यान, एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून नाशिक मार्गाने मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाल्यानंतरच लोकलसह एक्स्प्रेस गाड्या मुंबईच्या दिशेने सुटणार आहेत.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची