मुंबई : ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील दक्षिणेकडील बाजूचे अर्थात पुणे, नवी मुंबईहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. या मार्गिकेचे १ मे रोजी लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणे खाडी पूल १ आणि २ वरील भार कमी होणार असून पुणे, नवी मुंबई – मुंबई प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे.
मुंबई आणि नवी मुंबईला रस्ते मार्गे खाडी ओलांडून जाण्यासाठी सध्या दोन ठाणे खाडी पूल कार्यान्वित आहेत. पहिला ठाणे खाडी पूल १ आणि दुसरा ठाणे खाडी पूल-२. १९७३ मध्ये ठाणे खाडी पूल – १ बांधण्यात आला असून या दोन पदरी खाडी पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक होते. याच ठाणे खाडी पुलापासून २२ मीटर अंतरावर १९९४ मध्ये ठाणे खाडी पूल-२ बांधण्यात आला. या पुलावरून अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे ठाणे खाडी पूल-२ वरील भार दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहनांची संख्या वाढत असल्याने आता या पुलाचा सेवा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे या पुलांवरील भार कमी करण्यासाठी, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएसीने एकूण १.८३७ किमी लांबीचा तीन-तीन पदरी आणि ठाणे खाडी पूल २ ला समांतर असा ठाणे खाडी पूल ३ बांधण्याचा निर्णय घेतला. ७७५.५७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या कामास २०२० मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना संकट आणि इतर तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. पण कोरोना संकट टळल्यानंतर एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये ठाणे खाडी पूल ३ प्रकल्पातील उत्तरेकडील बाजू अर्थात मुंबईहून नवी मुंबई, पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यास मदत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी वसईतील (Vasai Crime) एका सात वर्षीय चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची घटना घडली…
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा…
मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच…
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…