नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते अनेक नवीन माणसांना भेटतात अनेक वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात. फेब्रुवारी २०२५ मध्ये पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. या काळात, ट्रम्प यांच्यासोबत, ते मस्क यांनाही भेटले. त्यानंतर आज (दि १८) पंतप्रधान मोदी यांनी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलाॅन मस्क यांच्याशी फोनवर चर्चा केली.
या संभाषणात दोघांनीही भारत आणि अमेरिका यांच्यातील तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनी या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण करून देत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. या संभाषणात, भारतातील वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्र आणि मस्क यांच्या कंपन्यांमधील वाढत्या सहकार्यावरही विशेष लक्ष देण्यात आले. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्टवर माहिती देत याबद्दल सांगितले आहे.
“मी मस्क यांच्याशी बोललो आणि या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसीमध्ये भेटलेल्या मुद्द्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या प्रचंड क्षमतेवर आम्ही चर्चा केली. भारत या क्षेत्रात अमेरिकेसोबतची भागीदारी आणखी मजबूत करण्यास पूर्णपणे तयार आहे.”
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…