Bhushan Gavai Chief Justice of India : न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून घेणार शपथ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश भूषण गवई ५२ वे सरन्यायाधीश होणार आहेत.विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची पुढील सरन्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार आगामी १४ मे रोजी न्यायमूर्ती गवई हे ५२ वे सरन्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.


विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना १३ मे रोजी निवृत्त होणार आहेत.त्यानंतर न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील आणि पदभार सांभाळतील. न्यायमूर्ती बी. आर. गवई हे २४ मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिने त्यांचा कार्यकाळ असेल. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी ते निवृत्त होतील. न्यायमूर्ती गवई हे भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित असतील. त्यांच्यापूर्वी २००७ मध्ये दलित न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन हे देशाचे सरन्यायाधीश झाले होते.



न्यायमूर्ती बी. आर. गवई मुळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला आहे. १६ मार्च १९८५ रोजी त्यांनी वकिलीला सुरुवात केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १७ जानेवारी २००० रोजी नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. १४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली. १२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे.

Comments
Add Comment

Election Commission : वादग्रस्त 'एसआयआर' मोहीम आता 'या' १२ राज्यांत!

बिहारमधील टीकेनंतरही केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; १२ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांत एसआयआरचा दुसरा

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू