Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Jioचा १९९ रूपयांचा रिचार्ज, मिळणार दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

मुंबई: जिओच्या अनेक रिचार्ज प्लानबद्दल तुम्ही आतापर्यंत ऐकले असेल मात्र तुम्हाला १९९ रूपयांच्या जिओच्या प्लानबद्दल माहिती आहे का? जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला रिचार्जचे अनेक पर्याय मिळतात. यात विविध किंमतीचे विविध फीचर्ससह अनेक प्लान्स असतात. येथे आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला १८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या दरम्यान ते कॉलिंग आणि डेटाचा फायदा उचलू शकतात. जिओच्या १९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. यात लोकल आणि एसटिडी कॉलचा समावेश आहे.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस वापरण्यास मिळतात. याच्या मदतीने तुम्ही कम्युनिकेशन्स करू शकतात. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री म्हणून मिळतील. यात जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाऊडचा वापर करण्यास मिळेल.

Comments
Add Comment