Good News : यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक, तब्बल १०५ टक्के पाऊस पडणार!

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसह संपूर्ण देशवासीयांसाठी दिलासादायक बातमी! भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार यंदा देशात मोसमी पाऊस सरासरीपेक्षा १०५ टक्के अधिक पडण्याची शक्यता आहे. एल निनो स्थिती निष्क्रिय असून, पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा, आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत हा हवामान अंदाज जाहीर करण्यात आला.



पावसाचे अंदाजित चित्र




  • जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात १०५% सरासरीहून जास्त पाऊस पडेल.




  • एल निनो अथवा ला निना यापैकी कोणतीही स्थिती सध्या सक्रीय नाही; दोन्ही महासागरांतील स्थिती तटस्थ व पावसाला पोषक आहे.




  • युरोशिया आणि हिमालयातील बर्फाच्छादनही यंदा कमी आहे – जी एक पावसास अनुकूल बाब मानली जाते.




  • गेल्या ५० वर्षांचा सरासरी पाऊस ८७ सेमी असून, यंदा त्यात ५% वाढ होण्याची शक्यता आहे.




कोणत्या भागात काय स्थिती?




  • देशाच्या बहुतांश भागात पावसाची स्थिती अनुकूल असेल.




  • मात्र लडाख, ईशान्य भारत आणि तामिळनाडू या भागात पावसाचे प्रमाण थोडकं राहण्याची शक्यता आहे.




उष्णतेच्या लाटा व दुष्काळाची शक्यता


हवामान विभागाने यासोबतच एप्रिल ते जून या कालावधीत अनेक भागात तीव्र उष्णतेच्या लाटा आणि काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.



शेतीसाठी सकारात्मक संकेत


या अंदाजामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरिपाच्या पिकांची पेरणी आणि उत्पादन दोन्ही वाढण्याची शक्यता असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा सकारात्मक फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा