मुंबई : ‘माहेरची साडी’ या चित्रपटातून घराघरात प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी चित्रपटसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवशाही- मुद्रा भद्राय राजते, कंसा कंसा, मधुचंद्राची रात्र, नटसम्राट, संध्या छाया अशा अनेक नाटकांमध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या अलका कुबल याचा चाहतावर्ग मोठा आहे. दरम्यान मनोरंजनसृष्टीत (Entertainment) खणखणीत अभिनयाच ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) या तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत.
लठ्ठपणावर भाष्य करणारं ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ यांची प्रस्तुती असलेलं एक ‘वजनदार’ (Vajandar Marathi Natak) नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे. विशेष म्हणजे या नाटकात त्यांची ‘वजनदार’ भूमिका सादर करणार आहेत. लठ्ठ असणं कुणालाच फारसं प्रिय नसतं. आपल्या लठ्ठपणाचा कॉम्प्लेक्स अनेकांना येत असतो. बारीक होण्याची धडपड. त्यासाठी चालणं, सायकलिंग, डाएटचे वेगवेगळे प्रकार, औषधं, जिम आणि बरंच काही… सुरु असतं. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलकाजी या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत. आपल्या कमबॅक विषयी बोलताना त्या सांगतात की, २७ वर्षांपूर्वी मी केलेल्या सुधीर भटांच्या ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकानंतर पुन्हा रंगभूमीवर मला काम करायचे होते, ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची उत्सुकता आहेच. माझी भूमिका प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वासही अलका यांनी व्यक्त केला.
‘वजनदार’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी २७ वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, मालिका करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. वजनदार माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.
वेगवेगळ्या सकस नाट्यकृती नाट्यरसिकांसाठी आणणाऱ्या ‘अष्टविनायक’ संस्थेने विप्रा क्रिएशन्स’ च्या साथीने आणलेल्या ‘वजनदार’ नाट्यकृतीचा शुभारंभ येत्या २४ एप्रिल रोजी यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे दुपारी ४ वाजता सादर होणार आहे.
मनोरंजनसृष्टीतल्या दोन नावाजलेल्या गुणी अभिनेत्री संपदा कुलकणी-जोगळेकर आणि अलका कुबल ‘वजनदार’ नाटकाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. संपदा कुळकर्णी-जोगळेकर लिखित आणि संतोष वेरूळकर दिग्दर्शित या नाटकात अभिनेत्री अलका कुबल मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. अलका कुबल यांच्यासह अभिषेक देशमुख, साक्षी पाटील,अभय जोशी, पूनम सरोदे आदि कलाकार यात आहेत.
दरम्यान, संध्या रोठे, प्रांजली मते, दिलीप जाधव यांनी ‘वजनदार’ या नाटकाची निर्मिती केली आहे. संगीत मंदार देशपांडे यांचे आहे. नेपथ्य सचिन गावकर तर प्रकाश योजना अमोघ फडके यांची आहे. वेशभूषा हर्षदा बोरकर तर रंगभूषा कमलेश बिचे यांची आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…