रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांत १०३ जणांचे खून!

९५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश


अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये १०३ जणांचा वेगवेगळ्या कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. पैकी ९५ गुन्ह्यांची उकल करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.


रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या १३ तालुक्यांपैकी १२ तालुक्यात खुनाचे गुन्हे घडले असून, त्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे अलिबाग, पेण, कर्जत, खालापूर व रोहा या तालुक्यांमध्ये घडले आहेत.



रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २८ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यामार्फत जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला जातो. गुन्हे घडू नये, यासाठी पोलिसांमार्फत वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृतीही केली जाते. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील पोलिसांकडून केली जाते. पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, जिल्ह्यात संशयावरून व अन्य कारणावरून खून करणाऱ्यांचा आकडादेखील वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.


रायगड जिल्ह्यातील खून प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रलंबित गुन्ह्यांबाबत कायमची फाईल बंद केली जात नाही. संबंधित आरोपींचा शोध सुरुच असतो. त्यांची माहिती घेण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरु असते. -सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : NAFA 2026 ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; सॅन होजेत रंगणार मराठी संस्कृतीचा जागतिक महोत्सव

मुंबई : उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय समुदायासाठी महत्त्वाचा ठरलेल्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म फेस्टिव्हल 2026’

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण

Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की

कोलंबो : भारत 'अ' आणि श्रीलंका 'अ' यांच्यातील रोमहर्षक झुंज केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर झालेल्या

Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच

Pune News: पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबलात तर ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे : पुणे विमानतळ (Pune Airport) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय