Mumbai News: सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करत व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल; रिलस्टार रणदीप गुजराल अटकेत

मुंबई : मुलुंड (Mulund) परिसरातील एका व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या रणदीप हरबिंदरसिंग गुजराल (वय 40) या रिलस्टारला अटक (Arrest) केली. या प्रकरणात आरोपीच्या कुटुंबातील दोन सदस्यांसह इतर काही जणांचाही सहभाग उघडकीस आला असून पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (14 जून) रोजी तरुणाला अटक केले असून किल्ला न्यायालयाने रणदीपला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गोवंडी परिसरात राहणारे व्यावसायिक असून मुलुंड येथे त्यांचे ‘पंजाबी पनीर’ नावाचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी रणदीप गुजराल त्यांच्या दुकानात आला होता. त्याने स्वतःची ओळख शासकीय अधिकारी म्हणून करून देत दुकानातील दुग्धजन्य पदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला.



याचवेळी त्याने दुकानात व्हिडीओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच दुकानाची बदनामी करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. ही बदनामी थांबवायची असेल तर पैसे द्यावे लागतील, अशी मागणी करत त्याने व्यावसायिकाकडून ऑनलाइन 56 हजार रुपये उकळले. उर्वरित रक्कम न दिल्यास आणखी बदनामी करण्याची धमकीही दिली होती.


या प्रकारामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.


रविवारी सायंकाळी आरोपी उर्वरित खंडणीची रक्कम घेण्यासाठी मुलुंडमधील सोनापूर सिग्नल परिसरात आला असता, आधीपासूनच सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली.


चौकशीदरम्यान आरोपीने शासकीय अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 85 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.



तपासात आरोपीच्या कुटुंबातील दोन सदस्य तसेच एका वृत्तपत्रातील कर्मचाऱ्याचाही सहभाग समोर आला आहे. सोशल मीडियाचा वापर करून व्यापारी आणि व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणे, खोटे व्हिडीओ व्हायरल करणे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळणे हा या टोळीचा मुख्य व्यवसाय असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, या टोळीने आणखी किती व्यापारी आणि व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीच्या सोशल मीडिया खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांचीही सखोल चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले