हैदराबाद : सध्या आयपीएलच्या निमित्ताने क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत २९ साखळी सामने झाले आहेत. गुजरात टायटन्स पहिल्या, दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, लखनऊ सुपर जायंट्स चौथ्या, कोलकाता नाईट रायडर्स पाचव्या, पंजाब किंग्स सहाव्या, मुंबई इंडियन्स सातव्या, राजस्थान रॉयल्स आठव्या, सनरायझर्स हैदराबाद नवव्या आणि चेन्नई सुपरकिंग्स दहाव्या स्थानावर आहे. प्रत्येक संघ कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. क्रिकेटपटूंचा खेळ सुधारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली.
सनरायझर्स हैदराबाद संघाचा मुक्काम बंजारा हिल्स परिसरातील पार्क हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये असताना हॉटेलला आग लागली. सोमवार १४ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हॉटेलच्या एका मजल्याला आग लागली. थोड्याच वेळात संपूर्ण मजला आगीने व्यापून टाकला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सनरायझर्स हैदराबाद संघाच्या क्रिकेटपटूंना तसेच हॉटेलमधील इतर पाहुण्यांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. अग्निशमन दलाने तीन बंबगाड्यांचा वापर करुन थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. आग आटोक्यात आली आहे आणि क्रिकेटपटू सुरक्षित आहेत.
मुंबई :राज्यात काही भागात पावसाचे वातावरण असले तरी बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान आहे.…
मुंबई: आजकाल निस्तेज आणि कोरड्या केसांच्या समस्येने साऱ्यांनाच ग्रासले आहे. अशातच अनेकजण केस सुरक्षित ठेवण्यासाठी…
मुंबई : महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि सगळे पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरलेत. ठाकरे…
पुण्यात राहून ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव ऐकलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. पण……
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…
स्टेशनवर उतरुन थेट बाप्पा चरणी मुंबई : मुंबई मेट्रो (Mumbai metro) रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रसिद्ध…