Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Nagpur Fire : ऍल्युमिनिअम कंपनी स्फोटात ५ जणांचा मृत्यू

Nagpur Fire : ऍल्युमिनिअम कंपनी स्फोटात ५ जणांचा मृत्यू

उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीजमधील घटना


नागपूर : नागपूर जिल्याच्या उमरेड एमआयडीसीतील एमएमपी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा स्फोट झाला. या घटनेत आतापर्यंत ५ कामगारांचा मृत्यू असून ११ कामगार जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. एकूण जखमींपैकी ९ रुग्णांना मेडिकलमध्ये हलवण्यात आले आहे.







यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याच्या उमरेड एमआयडीसी परिसरात एमएमपी ही अँल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. अँल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता मोठा स्फोट झाला. यामध्ये ३ कामगारांचा घटनास्थळी आणि दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना प्रारंभी उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल केले. कंपनीतील बहुतांश जखमी कामगारांना नागपूर येथे आणण्यात आले.

Comments
Add Comment