
पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्याहून नागपूर व दिल्लीसाठी (हजरत निझामुद्दीन) विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर व दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
पुणे - नागपूर - पुणे वातानुकूलित रेल्वे
१२ एप्रिल ते २४ मे दरम्यान
गाडी क्रमांक (०१४३९) पुण्याहून दर शनिवारी रात्री ७.५५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी नागपूरला दुपारी २.४५ मिनिटांनी पोहोचेल.-
१३ एप्रिल ते २५ मे दरम्यान
गाडी क्रमांक (०१४४०) दर रविवारी नागपूर येथून दुपारी ४. १५ मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी २.२० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल.

सोलापूर : हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या राजनंदिनी अनय कांबळे (रा. कोनापुरे चाळ) हिचा घरातील जिन्यावरून वरच्या खोलीत जाताना शॉक लागून ...
पुणे - हजरत निजामुद्दीन - पुणे वातानुकूलित रेल्वे
१५ एप्रिल ते २७ मे दरम्यान
गाडी क्रमांक (०१४४१) दर मंगळवारी पुण्याहून ५.३० सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१० मिनिटांनी हजरत निझामुद्दीन येथे पोहोचेल.
१६ एप्रिल ते २८ मे दरम्यान
गाडी क्रमांक (०१४४२) दर बुधवारी हजरत निझामुद्दीन येथून रात्री १०.२० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. ही गाडी रतलाममार्गे धावणार आहे.