Shegaon Ram Navmi : रामनवमीनिमित्त 'गण गण गणात बोते'च्या गजरात शेगावमध्ये भाविकांची मांदियाळी!

  58

बुलढाणा : आज राम नवमी सोहळा (Ram Navmi 2025) असून राज्यासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत असल्याचे दिसत आहे. प्रभू राम जन्माच्या सोहळ्यासाठी अनेक देव-देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या (Gajanan Maharaj) मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shegaon)



संत गजानन महाराज शेगावात आले होते तेव्हा पासून शेगावात रामनवमीचा (Shegaon Ramnavmi) सण साजरा केल्या जातो. त्याचप्रमाणे यंदाही शेगावात संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे. 'गण गण गणात बोते'च्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात आज बुलढाणा जिल्हयाच्या संत नगरी शेगावात रामनवमी चा  उत्सव निमित्त मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण राज्यातून नव्हे तर देशाच्या काना कोपऱ्यातून भाविक कालपासूनच शेगावात दाखल झाले आहेत. तर शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी काकडा आरती झाली तर दुपारी श्री चां पालखी सोहळा असणार आहे.


दरम्यान, या कालावधीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानाकडून काल रात्रीपासून भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले आहे. आज सुद्धा मंदिर खुले असणार आहे. तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत