Tadoba Safari : पर्यटकांसाठी आनंदवार्ता! ताडोबा सफारीसाठी धावणार ‘क्रुझर जिप्सी’

वनमंत्र्यांकडून हिरवा झेंडा


चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील (Chandrapur News) पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी (Tadoba Safari) थेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याकरिता शहरातून क्रुझर जिप्सीच्या (Cruiser Gypsy) सेवेला सुरूवात होत आहे. वनमंत्र्यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे. महिनाभरात सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली आहे. वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी ही मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.



ताडोबा हे देशभरात व्याघ्र प्रकल्पासाठी (Tadoba-Andhari Tiger Reserve) प्रसिद्ध आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे चंद्रपूर शहरातून ताडोबात क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केला होता. या मागणीला राज्याचे वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे.


या बैठकीत क्रुझरच्या मार्गाची वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. तसेच संजय सब्बनवार यांनी तयार केलेली गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी