बारामती : बारामतीमधील (Baramati News) एका हॉटेल मॅनेजरला काही जणांनी बेदम मारहाण (Crime) केल्याची घटना घडली. या घटनेची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या घटनेची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली आहे. संबंधित घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अशा घटना वारंवार घडल्या तर आपण थेट मकोका लावू, असा इशारा अजित पवारा यांनी दिला आहे.
मी काय कायम तुमच्यासोबत नाही. काळाच्या पुढं काही करता येत नाही. पण काम करताना नीट करतो. त्यामुळे पुढची लोकं म्हणतील चांगलं काम केलं. परवा माझ्याकडे क्लिप आली. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. फुटबॉल कसा खेळाला जातो तसा ते लाथा बुक्क्या मारत चालले होते. मी पोलिसांना सांगितलं, कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. मी असलं अजिबात खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले.
त्याचबरोबर असे काही गुन्हे लागतील की ते सतत अशे गुन्हे करत राहिले तर पुढे मोकका पण लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. तर मेहरबानी करा कोणीही कायदा हातात घेऊ नका, कोणी काही चुकीच कैलं तर पोलिसांकडून येऊन तक्रार करा असे आवाहन त्यांनी केलं. १४ तारेखेला घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. संविधानाची ७५ वर्ष पूर्ण झाली आहे, तरी काहीकाही जण स्वतःच्या घरीची मालमत्ता असल्यासारखं एखाद्याला बदडून काढत आहेत. हे होता कामा नये. असे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
तुमची मुलं काय करताहेत कुठं चुका करताहेत हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबादारी पालकांनी पार पाडवी मग मला मुंबईला फोन येतात. दादा चुकलं एकदा पोटात घ्या. आरं पोट फुटायला लागलं आणि काय म्हणतो पोटात घ्या, अशी मुश्किल टिपण्णी देखील अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली. सांगणाऱ्याला पण लाज, लज्जा काही शरम काही कशी वाटत नाही. एवढे त्याला बेदम मारलं. यामुळे शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही, असे देखीलb ते म्हणाले. (Ajit Pawar)
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…