मुंबई : रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याचा गैरवापर करुन गब्बर झालेल्या चहावाल्याला अटक करण्यात आली. ही कारवाई दक्षता विभागाच्या निरीक्षकांच्या निर्देशांनंतर केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाल्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्याप्रमाणे हुबेहूब असे बनावट सही शिक्के तयार करुन घेतले आणि त्यांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.
रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन घेण्यासाठी चहावाला प्रवाशांना मोठी रक्कम आकारत होता. स्वतःकडे असलेल्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन तो तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत होता. हा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू होता. यासाठी चहावाल्या रवींद्र कुमार साहूने विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवरील अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले होते.
साहूने बनावट सही शिक्के वापरुन रेल्वेचे तिकीट व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन देत दरमहा दीड ते दोन लाख रुपयांची कमाई सुरू केली होती. मागील काही महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. रेल्वे कोट्याचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर दक्षता विभागाने तपास सुरू केला. मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर. एस. गुप्ता यांचे पथक कोलकाता मेलमधील तिकीटधारकांची तपासणी करत होते. यावेळी काही प्रवाशांनी आम्ही अधिक पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतल्याचे सांगितले. दक्षता अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करत चौकशी सुरू केली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या कँटीनमध्ये कार्यरत चहावाला रवींद्र कुमार साहू हा व्हीआयपी कोट्याचा गैरवापर करत असल्याचे उघड झाले.
साहूने मागील तीन महिन्यांपासून दररोज पाच ते सहा तिकिटे व्हीआयपी कोट्यातून कन्फर्म करुन दिल्याची कबुली दिली आहे. पण मागील किमान दोन वर्षांपासून व्हीआयपी कोट्याच गैरवापर सुरू असल्याचा संशय रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणी साहूची चौकशी सुरू आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…