Mumbai News : पोलीस निरीक्षकांकडून सायबर गुन्हे प्रतिबंध, महिला व बाल लैंगिक अत्याचाराविषयी जनजागृती अभियान!

मुंबई : ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय माडये (गुन्हे) यांनी नुकतेच पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे प्रकटीकरण पथकांच्या अन्य अधिकाऱ्यांच्या साथीने अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यातील एक गुन्हा अत्यंत महत्वाचा असून गुन्ह्यात चोरलेले ५९ मोबाईल त्यांची अंदाजे किंमत ३ लाख १५ हजार रुपये हस्तगत करून मिळवलेले आहेत.



मागील काही दिवसात चैन स्न्याचींग आणि मोबाईल चोरीच्या घटना अंधेरी ओशिवरा आणि मुंबईत वाढलेल्या असताना त्यावर ताबा मिळवणे आणि गुन्हेगारांना पकडणे पोलिसांसाठी एक आव्हान ठरत होते अशा प्रसंगी आरोपींना पकडण्या साठी लोकांची सुद्धा साथ मिळावी म्हणून पोलीस आणि सर्वसामान्य जनता यातील नाते घट्ट करण्याची गरज होती हे ओळखून पोलीस अधिकारी विजय माडये यांनी रायगड मिलिटरी शाळेमध्ये आयोजित स्नेह संमेलन आणि विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रमांत ५०० ते ६०० विद्यार्थी आणि हजारो पालकांना प्रत्यक्ष सायबर गुन्हे कसे घडतात आणि आपण ते कसे रोकु शकतो तसेच महिला व बाल लैंगिक अत्याचार आणि त्याला प्रतिबंध कसा आणु शकतो त्याच प्रमाणे जेष्ठ नागरिकांवरील हल्ले सामाजिक सलोखा व इतर गुन्हे बाबत प्रतिबंध करण्यासंदर्भात जनजागृती केली.


पोलिसांच्या तातडीच्या सेवा मिळवण्यासाठी १००.१०१.१०२.१०३,१०४ क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले याव्यतिरिक्त ओशिवरा पोलीस ठाणेतील हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांनी ओरिएंटल कॉलेज, एच के कॉलेज ऑफ फार्माशी, सिटी इंटरनॅशनल स्कूल, तसेच रामजन्म कथा महोत्सव या व अशा ठिकाणीसुद्धा नागरिकांना अशाच पद्धतीचे योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होत असून नागरिक आरोपी विरोधात तक्रात करायला पुढे येत आहेत, त्याच प्रमाणे लैंगिक अपराधा संदर्भातील शंभर टक्के गुन्हे पोलीस अधिकाऱ्यानी अहोरात्र मेहनत करून आणि जीवाची परवा न करता उघडकीस आणल्याची माहिती पोलीस अधिकारी विजय माडये यांनी दिली आहे .

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित