Tuesday, April 22, 2025
HomeदेशPiyush Goyal : पीयूष गोयल यांच्या विधानावरून वाद; तर Zepto सीईओने केला...

Piyush Goyal : पीयूष गोयल यांच्या विधानावरून वाद; तर Zepto सीईओने केला स्टार्टअप्सवरून पलटवार

नवी दिल्ली : आजकाल मार्केटमध्ये ई कॉमर्स कंपन्यां बऱ्याच प्रमाणात चालत आहेत. या कंपन्यांनी लाखो लोकांना रोजगार दिला आहे. आता हे चांगलं कि वाईट यावर कोणीच विचार केलेला नाहीये. या नोकरीत सर्व डिलिव्हरी बॉयना महिन्याला २० ते २५ हजार रुपये सुटतात. मात्र, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या स्टार्टअप महाकुंभ २०२५ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यावेळी ते म्हणाले की, डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल बनून आपण आनंदी आहोत का? या प्रकारच्या नोकरी देण्यावर आक्षेप नोंदवलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार हे डिलिव्हरी अ‍ॅप बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवत आहेत.

गोयल यांनी चीनच्या स्टार्टअप सिस्टीमशी तुलना करताना म्हटलं की, भारतात आम्ही डिलिव्हरी अॅप्स बनवले आहेत, जे खूप वेगानं लोकांपर्यंत वस्तू पोहोचवत आहेत. ही आपली परिस्थिती आहे, तर चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करत आहे आणि ते इलेक्ट्रिक वाहनांवरही वेगानं काम करत आहेत. स्टार्टअपच्या जगातूनही प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यानंतर झेप्टोच्या सीईओंनी भारतीय स्टार्टअप्सचा बचाव करत मोठं वक्तव्य केलं. आम्ही दीड लाख नोकऱ्या निर्माण केल्या आहेत आणि सरकारला दरवर्षी १००० कोटी रुपयांचा कर भरतो, असं ते म्हणाले.

Devendra Fadanvis : राज्यातील सर्व शाळांचे ‘जियो टॅगिंग’ होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

पियुष गोयल काय म्हणाले?

स्टार्टअप महाकुंभ २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, भारतीय स्टार्टअप्सना ते काय करत आहेत हे माहित असणे आवश्यक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत खरोखर मूल्य वाढवणाऱ्या उद्योगांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आपण स्पर्धेपासून दूर जाऊ नये, तर नवोपक्रम आणि दीर्घकालीन शाश्वततेसाठी काम करावे. आपल्याला जागतिक पातळीवर जाऊन मोठा विचार करायला हवा. जेव्हा आपण सखोल तंत्रज्ञानाकडे पाहतो तेव्हा इकोसिस्टममध्ये फक्त एक हजार स्टार्टअप्स आहेत आणि ते चिंताजनक आहे. कमी कालावधीत पैसे कमवण्याऐवजी, स्टार्टअप्सनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

झेप्टोच्या सीईओचा पलटवार

झेप्टोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित पलिचा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. “भारतात कन्झुमर इंटरनेट स्टार्टअपवर टीका करणं सोपं आहे. जेव्हा आपण त्यांची तुलना चीन आणि अमेरिकेच्या नेत्रदीपक तांत्रिक प्रगतीशी करता तेव्हा हे सर्व घडतं. आपलंच उदाहरण घ्यायचं झाले तर आम्ही झेप्टोच्या माध्यमातून दीड लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. हे एका कंपनीनं केलंय जी ३.५ वर्षांपूर्वी अस्तित्वातही नव्हती. आम्ही दरवर्षी एक हजार कोटी रुपयांचा कर भरतो. अब्जावधी डॉलर्सचा एफडीआय भारतात आला असून सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी सातत्यानं गुंतवणूक केली जात आहे. भारताच्या इनोव्हेशनच्या जगतात हे एखाद्या जादू प्रमाणे नाही तर काय?” असं आदित पलिचा म्हणाले.

 आपण एआय मॉडेलवर मोठ्या प्रमाणावर काम का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. कारण आपण मोठ्या इंटरनेट कंपन्या तयार केल्या नाहीत. बहुतांश तांत्रिक बाबी कन्झुमर इंटरनेट कंपन्यांनी आणल्या आहेत. गेल्या दोन दशकांची ही कहाणी आहे. आज अॅमेझॉन, अलिबाबा, फेसबुक, गुगल, टेनसेंट अशा मोठ्या इंटरनेट आहेत. या कंपन्या प्रामुख्यानं कन्झ्युमर इंटरनेट कंपन्या आहेत. कारण कन्झ्युमर इंटरनेट कंपन्यांकडे मोठा डेटा आहे. जर आपण देशांतर्गत बाजारपेठेत कोट्यवधी डॉलर्स कमवणार आहोत आणि यशस्वी होत राहिलो तर आम्ही एक मोठा तांत्रिक बदल घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -