Saturday, February 14, 2026

Central Railway : तीन दिवस मध्य रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक!

Central Railway : तीन दिवस मध्य रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक!

रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) लोणावळा आणि मळवली दरम्यान प्रस्तावित रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी ४ स्टील्सच्या लाँचिंगसाठी येत्या रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Railway Block) घेण्यात येणार आहे. पहिला ब्लॉक हा रविवार ६ एप्रिल रोजी दुपारी २.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत घेण्यात येईल. लोणावळा- मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी तीन दिवसीय ब्लाॅक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस लोणावळा येथे दुपारी ४.०५ वाजेपर्यंत व लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्सप्रेस कर्जत येथे दुपारी ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल. ग्वाल्हेर - दौंड एक्सप्रेस चौक येथे १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान पुणे - लोणावळा ईएमयू आणि शिवाजी नगर - लोणावळा ईएमयू मळवली येथे खंडित केली जाईल. तर लोणावळा - पुणे ईएमयू आणि लोणावळा - शिवाजी नगर ईएमयू मळवली येथूनच परत पाठवली जाईल. (Railway Power Block) जाणून घ्या विशेष पॉवर ब्लॉक दरम्यान असणारे वेळापत्रक.

ब्लॉक १

रविवार, ६ एप्रिल रोजी दुपारी २.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत

लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक २२१५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे दुपारी ४.०५ वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा एक्स्प्रेस कर्जत येथे दुपारी ३.२० वाजेपर्यंत थांबवण्यात येईल.
  • गाडी क्रमांक २२१९४ ग्वाल्हेर – दौंड एक्स्प्रेस चौक येथे १० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.

पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१४ पुणे – लोणावळा लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल आणि गाडी क्रमांक ९९८१५ लोणावळा – शिवाजी नगर लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.

ब्लॉक २

सोमवार, ७ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी २.३५ पर्यंत

पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.

    ब्लॉक ३

    मंगळवार, ८ एप्रिल रोजी दुपारी १.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत

    पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल

  • गाडी क्रमांक ९९८१६ शिवाजी नगर – लोणावळा लोकल मळवलीपर्यंत चालवण्यात येईल. मळवली – लोणावळा लोकल सेवा उपलब्ध नसेल.
  • गाडी क्रमांक ९९८१३ लोणावळा – पुणे लोकल मळवली येथून चालवण्यात येईल. ही लोकल लोणावळ्याऐवजी मळवली येथून सुटेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >