
पणजी: सिंधुदुर्ग ते पुणे थेट विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे. गोव्यातील फ्लाय - ९१ या कंपनीने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी (०१ एप्रिल) पासून ही विमानसेवा सुरु केली आहे. आठवड्याचे पाच दिवस ही विमानसेवा सुरु असेल.
फ्लाय - ९१ कंपनीने मंगळवारी (०१ एप्रिल) पासून सिंधुदुर्ग - पुणे - सिंधुदुर्ग विमानसेवा सुरु करण्यात आली. पुण्यातून सकाळी ७.५० वाजता सुटलेले विमान सकाळी ९.१० वा सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रवाशांना लाभ होणार आहे.

चैत्री यात्रेनिमित्त प्रशासनाचा निर्णय सोलापूर : पंढरपूरची चैत्री यात्रा (Pandharpur News) ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा आहे. ही यात्रा चैत्र ...
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ ते पुणे विमानतळ सोमवार आणि शुक्रवार वगळता आठवड्याचे पाच दिवस विमानसेवा सुरु राहणार आहे. फ्लाय - ९१ या कंपनीने कंपनीच्या संकेतस्थळावरुन फ्लाईट बुकिंगला सुरुवात केली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. अखेर दोन महिन्यानंतर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. कंपनीने लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग देखील विमानसेवा लवकरच सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग - पुणे विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला २,९४१ रुपये मोजावे लागतील. यात विविध कर वाढण्याची शक्यता आहे. नमूद करण्यात आलेला दर कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. गोव्यात येण्यासाठी फ्लाईट चुकल्यास अथवा विमानभाडे परवडत नसल्यास पर्यटकांना चिपी विमानतळावरुन गोव्यात येणे सोप्पं होणार आहे. शिवाय सिंधुदुर्गसह गोव्यातील पर्यटनासाठी आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.