ठाणे : दिवा आणि मुंब्रा भागात कारवाईच्या दुसऱ्या दिवशी २७ अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. पहिल्या दिवशी २९ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. अनधिकृत टँकर भरणाप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच अनधिकृत नळ जोडणीबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिवा आणि मुंब्रा या भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करणे, अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र काढणे यासाठी विभागनिहाय टीम तयार केल्या आहेत. त्यांनी कारवाईच्या दुसऱ्या दिवशी कल्याण फाटा ते वाय जंक्शन या भागातील १४ अनधिकृत व्यावसायिक (दुकाने, टपऱ्या) नळ जोडण्या खंडित केल्या. तर १० घरगुती अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या. वाय जंक्शन ते मुंब्रा-ग्लोबल नाला आणि आगासन गाव येथे १३ निवासी अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. आगासन गाव येथे ६ नळजोडण्या तर ४ टँकर पॉईट उध्दवस्त करुन ६ पंप जप्त करण्यात आले. त्याचबरोबर,तीन अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र उद्धस्त करण्यात आले. या कारवाईत पाच पंप जप्त करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई करण्यात येत आहे.
हैदराबाद : हैदराबाद आणि तेलंगणातील इतर भागांत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून…
मुंबई : ओपनएआयने गेल्या आठवड्यात चॅटजीपीटीच्या (ChatGPT) नवीन फीचर्सची घोषणा केली असून, त्यामध्ये स्टुडिओ घिबली…
पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ…
सोलापूर : उन्हाच्या तडाख्याने वाढलेल्या उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या दिनेश नरहरी क्षीरसागर (रा. अकोलेकाटी,…
जयराम रमेश यांची पत्रकार परिषदेत माहिती नवी दिल्ली : मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि द्रविड…
नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) बहुमताने मंजूर झाले.…