मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठक; काय निर्णय झाला?

मुंबई: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवार, दि. ०५.०३.२०२६ रोजी सायंकाळी ०५.०० वा. विधानभवन येथे पार पडली.


यावेळी समितीने मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर आढावा घेतला. सचिव (सा.वि.स.) यांनी कामकाजाबाबत माहिती दिली.


१. मा.न्या. संदीप शिंदे समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यामध्ये ४८ लाख कुणबी नोंदी आढळलेल्या असून त्याआधारे एकूण १२,११,३०३ कुणबी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलेली आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये २,५७,०८४ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आलेली आहेत. सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ अखेर ६ महिन्यांच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण ४९,९५८ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. केवळ बीड जिल्ह्यात ३४,६९२ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत.


२. मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा व हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्धच्या न्यायालयीन याचिकांचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीने घेऊन विशेष समुपदेशी (Special Counsel) नियुक्त करण्याबाबत निर्देश दिले आहेत.


३. सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ समितीने विभागीय आयुक्त, पुणे यांना अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले.


४. मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान दाखल झालेल्या एकूण १६१ गुन्ह्यांपैकी केवळ ७१ गुन्हे मागे घेणे प्रलंबित आहेत तर मुंबई येथील आंदोलन दरम्यान दाखल ८ गुन्ह्यांपैकी ७ गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत.


५. मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या ३०६ व्यक्तींपैकी २७५ व्यक्तींच्या वारसांना १० लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात आले आहे. ३१ प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ कार्यवाही करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने निर्देश दिले आहेत. तसेच मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या २१ वारसांना राज्य परिवहन महामंडळामध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती यांनी वारसांना नियुक्ती देण्याबाबत संचालक मंडळामध्ये ठराव घ्यावा असे निर्देश उपसमितीने दिले.


६. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळत नाही, त्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विभागाने सादर करावा असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने दिले.


७. मराठा समाजसंबंधी कामकाज करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीने निर्देश दिले.


८. मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा मा. न्यायालयाने रद्द केल्यामुळे स्पर्धा परीक्षेहून शासन सेवेत निवड झालेल्या १५५३ उमेदवारांची नियुक्ती रद्द झाली होती. या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने २०२३ मध्ये कायदा करून या उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती दिली आहे. या उमेदवारांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्याबाबत व त्यांना शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत उपसमितीने निर्देश दिले आहेत.


९. EWS प्रवर्गातून अर्ज दाखल केलेल्या व SEBC आरक्षण लागू झाल्यानंतर प्रवर्ग बदल न केल्यामुळे निवड होऊनही नियुक्ती न दिलेल्या उमेदवारांना सामावून घेण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना उपसमितीने दिल्या आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून विविध धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती व कायदेशीर तरतुदी संकलित करण्याबाबत उपसमिती बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा