Maruti ची गाडी खरेदीचा विचार करताय? तर आधी हे ज़रूर वाचा…

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांच्या पोर्टफोलिओच्या किंमती अपडेच करण्याची घोषणा केली आहे. हे वर्षात तिसऱ्यांदा घडत आहे की कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करत आहे. कंपनीने आगामी ८ एप्रिल २०२५ पासून आपल्या अनेक कार मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढीची घोषणा केली आहे.  मारूती वॅगन आर पासून ते ग्राँड व्हिटारापर्यंत सर्व मॉडेलच्या किंमतीमध्ये २५०० रूपयांपासून ते ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे. 

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विविध मॉडेलसाठी येणारा खर्च तसेच ऑपरेशनल खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे गरजेचे झाले. इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीमुळे ही वाढ केल्याचे सांगितले जात आहे. 

किती वाढणार किंमत?


मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, किंमतीमधील वाढ ही विविध मॉडेलवर अवलंबून असणार आहे. कंपनीची प्रसिद्ध एसयूव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतीत ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ होईल. तर कंपनीची स्वस्त व्हॅन मारुती इकोमध्ये २२ ५०० रूपयांची वाढ होईल.  मारूतीच्या वॅगन आरच्या किंमतीत १४ हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाईल.  याशिवाय मल्टी पर्पज व्हेईकल एक्सएल६ आणि अर्टिगा यांच्या किंमती १२५०० रूपयांपर्यंत वाढतील. 

भारतीयांची आवडती कार Wagon R…


गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात या कारच्या १,९८,४५१ युनिटची विक्री केली. कंपनीचा दावा आहे की गेल्या चार आर्थिक वर्षांपासून ही कार सातत्याने बेस्ट सेलिंग कार ठरत आहे. 
Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.