
मुंबई : स्टार प्रवाह दिवसेंदिवस प्रेक्षकांचं मनोरंजन वाढवण्यासाठी मालिकेच्या स्वरूपात वेगवेगळे प्रयोग करत आहे. अनेक जुन्या मालिकांना निरोप देऊन नवीन कंटेन्टसह प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी या वाहिनीवर 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता एका नव्याकोऱ्या रिॲलिटी शोचा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस ५ ची आणि सध्या मास्टर शेफ या रिऍलिटी शो मधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री निक्की तांबोळी झळकणार आहे.

MNS leader Ameya Khopkar Angry Reaction On Fawad Khan Comeback : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान नऊ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो अभिनेत्री वाणी कपूरसोबत 'अबीर गुलाल' या हिंदी ...
मिळालेल्या माहितीनुसार, 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेचे दोन प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित झाले असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या दोन्ही प्रोमोमधून गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमीत खेडेकर, अमृता माळवदकर,साक्षी गांधी, साक्षी महाजन, भाग्यश्री पवार, नंदिनी वैद्य, मंदार जाधव मुख्य भूमिका तर खलनायिकेच्या भूमिकेत सुकन्या मोने दिसणार आहेत. याचबरोबर या मालिकेत बिग बॉस फेम निक्की तांबोळी देखील दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घोषणेमुळे निक्कीच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.