IPL 2025:  लिव्हिंगस्टोन आणि डेविडची तुफानी खेळी, आरसीबीचे गुजरातला १७० धावांचे आव्हान

बंगळुरू: आयपीएल २०२५५च्या १४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. आरसीबी आपल्या घरच्या मैदानावर या हंगामातील पहिला सामना खेळत आहे. आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद १६९ धावा केल्या आहेत. आरसीबीने गुजरात टायटन्सला विजयासाठी १७० धावांचे आव्हान दिले आहे. 

पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरूवात खराब राहिली.  दुसऱ्याच ओव्हरमध्ये आरसीबीला विराट कोहलीच्या रूपात पहिला झटका बसला. कोहली केवळ ७ धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्याच षटकांत देवदत्त पड्डिकलला सिराजने बोल्ड केले. ५व्या षटकांत फिल सॉल्टलाही सिराजने बाद केले. ७व्या षटकांत कर्णधार रजत पाटीदारला इशांतने बाद केले. 

यानंतर जितेश शर्माने मोर्चा सांभाळला.  त्याने ३३ धावांची खेळी केली. मात्र तो १३व्या षटकांत बाद झाला. मात्र यानंतर लिव्हिंगस्टोनने तुफानी खेळी केली. त्याने अर्धशतक ठोकले. तर टीम डेविडनेही शानदार फलंदाजी केली.  याच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत ८ बाद १७० धावा केल्या. 
Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील