दिवा आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित; अनधिकृत टँकर भरणा केंद्रही केले बंद

ठाणे महापालिकेची कारवाई


ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बुधवारी दिवा-आगासन भागात २४ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. तसेच, याच भागात सुरू असलेले अनधिकृत टॅंकर भरणा केंद्रही तत्काळ बंद करण्यात आले. ही कारवाई आणि तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.



महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार,अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दिवा-आगासन भागातील अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.याच भागात सुरू असलेल्या अनधिकृत टॅंकर भरणा केंद्राचा पंप,पाईपलाईन जप्त करण्यात आली. तसेच,अनधिकृत टॅंकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येत असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.


टाक्या, मोटर पंप जप्त करण्यात आले.ही कारवाई परिमंडळ उपायुक्त मनीष जोशी,उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे,उपनगर अभियंता विनोद पवार, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंके, प्रशांत फिरके यांच्या उपस्थितीत मुंब्रा-दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणेही कारवाई केली.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल