Maharashtra Weather : उन्हाळ्यात पावसाळा! ढगाळ वातावरणामुळे आश्चर्य करणारा हवामानाचा इशारा

पहा राज्यात कसं असेल तापमान?


मुंबई : चैत्र महिन्याला सुरुवात होताच राज्यातील अनेक भागांमध्ये उकाड्याची (Weather Update) वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाच्या झळांचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळणार (Rain Alert) असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर भारतात सातत्याने होणाऱ्या हवामान बदलासह मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढण्यास सुरुवाच झाली आहे. य़ादरम्यान मराठवाड्यात चक्री वादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.



शहरातील वाढत्या तापमानामुळे आज आणि उद्या मुंबईत हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची दाट शक्यता आहे. तसेच “मराठवाडा आणि आसपासच्या भागात खालच्या ट्रॉपोस्फीअरमध्ये चक्राकार अभिसरण आहे.” त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडू शकतो, तर ठाणे सारख्या जवळच्या भागात अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे, हवामान विभागाने सांगितले (Meteorological Department) आहे.



ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट 


आयएमडीने ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने हलक्या ते मध्यम पावसासह वारे वाहण्याची शक्यता आहे. (Mumbai Weather)



आज नाशकात ऑरेंज अलर्ट 


मंगळवारी नाशिकसह जळगावला ‘ऑरेंज’ आणि धुळ्यात पावसाचा ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना अवकाळी पावसाच्या संकटासह तापमानवाढीचासुद्धा सामना करावा लागणार आहे. पावसाची ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असून यादरम्यान ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Nashik Weather)



पुण्यातही पावसाची शक्यता (Pune Weather)


पुणे शहरात आज ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील किमान तापमान २२ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. पुण्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.


दरम्यान, बदलत्या हवामानमुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वातावरणात वारंवार होत असलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग

पुण्यात हायव्होल्टेज सामना; आंदेकर कुटुंबाकडे किती मालमत्ता? प्रतिज्ञापत्रातून खुलासा

आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रभाग क्रमांक २३ मध्ये जोरदार सामना पहायला मिळणार

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर धावत्या खाजगी बसला भीषण आग

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघातांचे आणि आगीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नाहीये. आज पुन्हा एकदा

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे ४० जण जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस माजवत अनेक जणांना चावा घेतला आहे. या