Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसाप्ताहिकअर्थविश्व

Poco C71 : 'पोको सी७१' स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिलला लाँच होणार

Poco C71 : 'पोको सी७१' स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिलला लाँच होणार
मुंबई : पोको हा भारतातील आघाडीचा ब्रँड 'द अल्टिमेट ब्‍लॉकबस्‍टर' पोको सी७१ सह किफायतशीर स्‍मार्टफोन श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍यास सज्‍ज आहे. खिशाला परवडणारा योग्‍य एंटरटेनर असलेला हा स्मार्टफोन शुक्रवार ४ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.



'पोको सी७१' या स्‍मार्टफोनमध्‍ये त्‍याच्‍या श्रेणीमधील सर्वात मोठा, सर्वात स्‍मूद आणि सर्वात सुरक्षित डिस्‍प्‍ले (६.८८ इंच एचडी + १२० हर्टझ डिस्‍प्‍ले) आहे. तसेच ट्रिपल टीयूव्‍ही सर्टिफिकेशन आहे. ज्‍यामुळे डोळ्यांचे रक्षण होण्यास मदत होईल. प्रीमियम स्प्लिट ग्रिड डिझाइनमध्‍ये अधिक स्‍लीक व आधुनिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे सी७१ स्‍टायलिश असण्‍यासोबत शक्तिशाली देखील झाला आहे. पोको इंडियाच्‍या सोशल मीडिया हँडल्‍सवर ऑफिशियल केव्‍ही लाँच करत पोको सी७१ च्‍या पहिल्‍या लूकचे अनावरण करण्‍यात आले.
Comments
Add Comment