Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीAlphanso Mango : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची यूरोप,अमेरिका स्वारी!

Alphanso Mango : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची यूरोप,अमेरिका स्वारी!

५० हजार पेट्यांची मुंबईतून निर्यात

मुंबई : गुढीपाडवाच्या मुहूर्तावर (Gudi Padwa 2025) रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या (Alphanso) ५० हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. स्थानिक बाजारेपेठेत गुढीपाडव्यामुळे आंब्याला चांगली मागणी होती. हापूस आंब्यांच्या पेटीला २ ते ५ हजार एवढा दर होता.

Sikandar : सलमान खानला धक्का! सिकंदर रिलीज होताच झाला ऑनलाइन लीक

कोकणातूनच ४० हजार पेट्या आंबा

गुढीपाडवा मुहूर्त साधत कोकणातील आंबा (Konkan Mango) उत्पादक शेतकरी मार्केटमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी पाठवत असतात. रविवारी देखील मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांचा ४० हजार ३६४ पेट्या दाखल झाल्या. तसेच इतर राज्यातील १० हजार ५१८पेट्या दाखल झाल्या आहेत. दरवर्षी या प्रमाणात पेट्या मार्केटमध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे कोकणचा हापूस निर्यात होण्यास सुरुवात गुढीपाडव्यापासून सुरुवात होत असते.

किरकोळ बाजारात दर चढेच

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्यांचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.यामुळे आंब्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गुढीपाडव्या दरम्यान आंब्यांची पेटी २५०० ते ३००० रुपयांना मिळत होती. यंदा हे दर ३,५००ते ४,०००रुपये आहे. तसेच एका डझन हापूस आंबा ९०० ते १,५०० रुपये डझन मिळत आहे.

अवकाळीचा आंबा पिकाला फटका

कोकणची अर्थव्यवस्था आंब्या पिकावर आहे. परंतु लहरी निसर्गाचा फटका आंब्यांला सध्या बसत आहे. सध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आल. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. यंदा हापूस आंब्यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. केवळ २५ ते ३०टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. उत्पादन कमी त्यात अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागातदार मेटाकुटीला आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -