जयपूर : राजस्थानचे राज्यपाल आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरला शनिवारी(दि.३०)अपघात झाला. मात्र अपघातामध्ये ते थोडक्यात बचावले आहे. राजस्थानमधील पाली येथून हरिभाऊ बागडे यांचं हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
https://prahaar.in/2025/03/30/prime-minister-modi-spoke-in-marathi-in-nagpur-what-did-he-say-in-his-speech/
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक स्फोट झाला. ही घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळच्या सुमरास घडली.हरिभाऊ बागडे हे राजस्थानवरून पाली येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते जयपूरला निघाले होते त्याचवेळी ही घटना घडली.पाली येथून हेलिकॉप्टरने उड्डान घेत असताना हेलिकॉप्टरच्या मागच्या भागात स्फोट झाला. स्फोट होताच धूर निघू लागला. स्फोट झाल्याचे लक्षात घेता पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग केले. त्यामुळे सुदैवाने या अपघातामध्ये पायलटसह हरिभाऊ बागडे थोडक्यात बचावले.
या अपघाताचा व्हिडीओ आता समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सुरक्षेतील मोठी चूक आढळून आल्याचे सांगितले जात आहे. राज्यपाल बागडेंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला जाऊ शकतो. सध्या या अपघाताची चर्चा होत आहे.
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…