पालघर : सरकारकडून वारंवार सतर्कतेच्या सूचना देऊनही बरेचजण डिजिटल अरेस्टला बळी पडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना पालघरच्या बोईसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बोईसर पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर तालुक्यातील बोईसर नजीक असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्प वसाहतीत ७१ वर्षीय सेवानिवृत्त नागरिक वास्तव्यास आहेत. या ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल नंबरवर व्हाट्सअप कॉल करून अंधेरी पोलीस ठाणे येथून बोलत असल्याचे सांगत तुमचा मोबाईल अवैध ॲडव्हर्टायझिंग व हॅरसमेंटमध्ये ट्रेस झाला आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी गेले असून सीबीआयमार्फत याचा तपास करण्यात येणार आहे.
तुम्हाला अटक करण्यात येणार असून सहकार्य न केल्यास दहा मिनिटात पोलीस घरी येतील आणि याबाबतची गुप्तता ठेवली नाही तर पाच वर्षांहून अधिकची शिक्षा भोगावी लागेल असे वक्तव्य प्रमोद शंकर भोसले आणि प्रदीप सावंत नावाच्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिकाला केली. त्यानंतर गुन्हेगारांकडून सीनियर सिटीजन आहात म्हणून यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर आमचे ऐकावे लागेल हे एक सीक्रेट मिशन असून जर तुम्ही ऐकल नाही तर तुम्हाला अटक होईल, मुलीला देखील त्रास होईल असे सांगण्यात आले. तुमच्या बँक खात्यांची सीबीआय आणि रिझर्व बँक मार्फत चौकशी करून ही रक्कम १० मार्च २०२५ पर्यंत परत करण्यात येईल असे सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले.
या संपूर्ण प्रकाराने भयभीत झालेल्या ज्येष्ठ नागरिकाने १८ डिसेंबर २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या बँक अकाउंट मधून तब्बल ३ कोटी ५६ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम आरोपींना पाठवली. मात्र आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला सांगितल्याप्रमाणे १० मार्च ही तारीख उलटली तरीही त्यांची करोडोंची रक्कम त्यांना परत करण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाणे बोईसर पोलीस ठाणे गाठत याबाबतची तक्रार दाखल केली. दरम्यान पोलीस या गुन्हेगारांचा तपास करत आहेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्सशी आहे.…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…