Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाPAK vs NZ : पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ‘मायकल ब्रेसवेल’कडे किवी संघाची धुरा

PAK vs NZ : पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ‘मायकल ब्रेसवेल’कडे किवी संघाची धुरा

कर्णधार टॉम लॅथमच्या हाताला फ्रॅक्चर

हेन्री निकोल्सचा न्यूझीलंड संघात समावेश

आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका

नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार टॉम लॅथम हाताच्या फ्रॅक्चरमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व अष्टपैलू मायकल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आले आहे.

केकेआरचा सुनील नरेनला १६२८ दिवसांनी पहिल्यांदाच संघाबाहेर

न्यूझीलंड क्रिकेटने सांगितले की, लॅथमला सरावादरम्यान उजव्या हाताला दुखापत झाली. त्याचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला बरे होण्यासाठी चार आठवडे लागू शकतात. एक्स-रे रिपोर्टमध्ये गंभीर दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे. या काळात त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. लॅथमच्या जागी हेन्री निकोल्सचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. तर संघाचे नेतृत्व मायकेल ब्रेसवेलकडे सोपवण्यात आले आहे.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, ‘मालिकेच्या पूर्वसंध्येला कर्णधार टॉम लॅथम जखमी झाल्याचे पाहणे निश्चितच निराशाजनक आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करतो. लॅथमच्या अनुपस्थितीत मायकेल ब्रेसवेल कर्णधार असेल. त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने टी-२० मालिकेत शानदार कामगिरी केली. हे यश तो वनडे मालिकेतही कायम ठेवेल असा विश्वास मला वाटतो.’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -