न्यू चंदीगड : भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात (IND vs AFG Test Match) वर्चस्वपूर्ण कामगिरी करत एका डावाने आणि तब्बल ३०० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने तिन्ही विभागांत अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवत सामना अवघ्या तीन दिवसांत संपवला.
Leaving New Chandigarh with a massive win under the belt 🇮🇳
A complete team performance from #TeamIndia 🤍 Scorecard ▶️ https://t.co/Au50EfVM30#INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/MxUFJHvoq4 — BCCI (@BCCI) June 8, 2026
यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानचा डाव अवघ्या 152 धावांत गुंडाळला गेला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला मोठी धावसंख्या उभारण्याची कोणतीही संधी दिली नाही. 412 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला फॉलोऑन दिला. (IND vs AFG Test Match)
MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघातून वगळल्यानंतर, सूर्यकुमार यादवच्या ...
दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानच्या फलंदाजांची अवस्था फारशी वेगळी नव्हती. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संपूर्ण संघ केवळ 112 धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने एक डाव आणि 300 धावांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत कसोटी क्रिकेटमधील आणखी एक दिमाखदार कामगिरी आपल्या नावावर केली. (IND vs AFG Test Match)
WTC गुणतालिकेवर परिणाम नाही :
भारत तिसऱ्याच स्थानावर :
या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताच्या स्थानात कोणताही बदल होणार नाही. सध्या भारत कसोटी संघांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असून दुसऱ्या क्रमांकावरील संघाशी रेटिंगमध्ये मोठे अंतर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धचा दणदणीत विजयही भारताला क्रमवारीत वर नेऊ शकणार नाही. (IND vs AFG Test Match)
The first of many to come ✨ Manav Suthar caps off a dream debut with the Player of the Match award 👏 Relive his spell ▶️ https://t.co/UXQVUy1QqX#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1VzsrkJiY4
— BCCI (@BCCI) June 8, 2026
न्यू चंदीगड:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः युवा फिरकीपटू मानव सुथारने ...
तरीही या सामन्यातील भारताची सर्वांगीण कामगिरी आणि तिन्ही दिवसांत मिळवलेला एकतर्फी विजय आगामी मोठ्या मालिकांसाठी संघासाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे. (IND vs AFG Test Match)




