विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात मोठी दुर्घटना झाली. काम सुरू असताना वितळलेले स्टील अंगावर पडल्यामुळे आठ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
View this post on Instagram
स्टील प्रकल्पात काम सुरू असताना स्फोट झाला. स्फोटानंतर विशिष्ट प्रकारच्या भांड्यातले वितळलेले स्टील कामगारांच्या अंगावर उडाले. या दुर्घटनेत आठ कामगारांचा मृत्यू झाला. प्रकल्पातील इतर कर्मचाऱ्यांनी धावपळ केली आणि आग नियंत्रणात आणली. भाजलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
तेहरान : इराणआणि इस्रायलमधील लष्करी संघर्ष कमालीचा वाढला असून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. रविवारी इराणने इस्रायलवर शेकडो ...
घटनेची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी विशाखापट्टणमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि पोलीस आयुक्तांशी फोनवरून बातचीत केली. घटनेची माहिती घेतली आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. वितळलेले स्टील अंगावर पडून जखमी झालेल्या कामगारांना आवश्यक ती वैद्यकीय मदत तातडीने मिळवून द्या असेही निर्देश आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत. स्टील प्रकल्पातील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याविषयीची माहिती मिळताच आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले.
ओमान : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, 'होर्मुझ सामुद्रधुनी'च्या दक्षिणेला २४ भारतीय खलाशी असलेल्या 'एमटी मारिव्हिक्स' या जहाजाला ...
पंतप्रधानांनी जाहीर केली मदत
स्टील प्रकल्पातील दुर्घटनेविषयी पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तसेच पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना दोन - दोन लाखांची तर जखमींना उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले.
Saddened by the mishap at the Visakhapatnam Steel Plant. Condolences to those who have lost their loved ones. Praying that the injured recover at the earliest. The local authorities are providing all possible assistance to those affected. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF…
— PMO India (@PMOIndia) June 8, 2026
दुर्घटनेची चौकशी होणार
स्टील प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी होणार आहे. स्फोट नेमका का झाला हे जाणून घेतले जाईल. दुर्घटनेत ठार झालेले कर्मचारी कंत्राटी होते की कंपनीत कार्यरत होते हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.






